गिरणा पात्रात रुतला १२ चाकी वाळूने भरलेला ट्रक, जेसीबीच्या साहाय्याने केला जप्त

महा पोलीस न्यूज । दि.३ जुलै २०२५ । भडगाव तालुक्यातील वाक येथे गिरणा नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे याबाबत काल गिरणा नदी पात्रात बाहेर जिल्ह्यातील बारा टायरी टाटा कंपनीचा ट्रक गिरणा नदी पात्रात वाळूमध्ये फसला होता. याबाबत गावकऱ्यांनी महसूल विभागाला माहिती देत तात्काळ महसूल विभाग नदीपात्रात पोहोचले यावेळी दोन जेसीबी च्या साह्याने ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली व भडगाव तहसील कार्यालयाला जमा करण्यात आली.
संपूर्ण कारवाई तहसिलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी वाक मेहमुद जब्बार खाटीक, प्रशांत कुंभारे (टोणगाव), समाधान हुल्लुळे(कोठली),महसूल सेवक विशाल सुर्यवंशी,किरण मोरे (टोणगाव),पोलीस नाईक मनोहर पाटील,पो.काँ.महेंद्र चव्हाण आदींनी केली आहे.
या अवैध वाळू वाहतूक करणारा १२ टायरी ट्रकवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे महसूल विभागाकडून माहिती देण्यात आली.