संजय सावकारे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
जळगाव प्रतिनिधी –भुसावळ शहराचे चार वेळा आमदार असलेले संजय भाऊ सावकारे यांनी आज नागपूर येथील राज भवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी सी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
संजय सावकारे हे जळगावचे पालकमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली होती. तसेच त्यांनी भाजपच्या तिकिटावरून भुसावळ विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय सावकारे यांची वर्णी लागली आहे. संजय सावकारे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भुसावळ तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे दिग्गज नेते गिरीश महाजन या दोन ज्येष्ठ मंत्र्यांसह भाजपचे संजय सावकारे यांच्या रूपाने जिल्ह्यात तीन जणांना कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत. संजय सावकारी यांना कोणते खाते मिळते याकडेही आता लक्ष लागले आहे.