Politics
अखेर सावखेडा रस्त्याचे भाग्य उजळले..!
महा पोलीस न्यूज | २५ फेब्रुवारी २०२४ | शहरातील पिंप्राळा उपनगरपासून ते सावखेडा या मुख्य रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्याचे काम राज्य शासनाच्या विशेष निधीतून व्हावे याबाबतची मागणी स्थानिक नगरसेवकांनी लावून धरली होती. ही बाब लक्षात घेता रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी विशेष निधी उपलब्ध झाला असून आज या रस्त्याचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आ.राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, शोभा बारी, सुरेश सोनवणे, अतुल बारी, सावखेडा गावाचे सरपंच संतोष पाटील, जाकीर पठाण, मोहम्मद नूर, किरण भोई, प्रगतशील शेतकरी उत्तम चौधरी व सावखेडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.