Social

बेशीस्त हॉकर्सला शनिपेठच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तंबी!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील शनिपेठ आणि बळीराम पेठ मुख्य मार्गावर भाजीपाला विक्रेते बसतात. बहुतांश हॉकर्स रस्त्यावर गाड्या लावत असल्याने वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच कावेरी कमलाकर यांनी बेशिस्त हॉकर्सला शिस्त लावण्यासाठी पाऊले उचलले आहेत. स्वतः पायी फिरून त्यांनी सर्वांना तंबी दिली आहे.

जळगाव शहरातील बळीराम पेठ आणि शनिपेठ परिसरात मुख्य रस्त्यावर दररोज भाजीपाला विक्रेते बसतात. भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला न उभे राहता भिंतीपासून ५ ते ७ फूट पुढे उभे राहत असल्याने जवळपास अर्धा रस्ता हॉकर्सने व्यापला जातो. त्यातच खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावर आपली वाहने उभी करत असल्याने बऱ्याचदा पायी चालण्यास देखील जागा शिल्लक नसते. शनिपेठ पोलीस ठाण्याकडून ये-जा करण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. जळगाव मनपा अतिक्रमण विभागाचे लागेबांधे असल्याने ते देखील हॉकर्सवर कारवाई करत नाही.

शनिपेठ निरीक्षकांनी मारली पायी रपेट
शनिपेठ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दोन दिवसापूर्वीच पायी संपूर्ण बाजारात आणि परिसरातील गल्लीत पायी गस्त घालून परिसराची माहिती घेतली. अनेक दिवसापासून बंद असलेली भिलपुरा चौक पोलीस चौकी देखील स्वच्छ करीत त्यांनी त्याठिकाणी दररोज सायंकाळी नाकाबंदी सुरु केली आहे. बाजारातील सर्व भाजीपाला विक्रेत्यांना देखील त्यांनी तंबी दिली आहे.

हॉकर्सवर कारवाईची आवश्यकता
निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बाजारात फिरून रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना चांगलाच दम दिला. तसेच ८ ते १० भाजीपाला विक्रेत्यांचे वजन काटे देखील त्यांनी जप्त केले. बेशिस्त हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी शिस्त लावण्याची गरज असून कावेरी कमलाकर यांच्या कार्यकाळात बळीराम पेठ आणि शनिपेठचा मुख्य रस्ता आणि गल्ल्या मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button