शांतता समितीची बैठक: अमळनेर शांतता समितीची बैठक; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन
अमळनेर शांतता समितीची बैठक; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन|

अमळनेर (पंकज शेटे ) :आगामी काळातील सण उत्सवानिमित्त २0 ऑगस्ट रोजी 11 वाजता शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना करण्यात आले कुंटे रोड मार्गावरील लाड शाखीय मंगल कार्यालया येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीला पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, प्रांताधिकारी नितीन मुंडावरे ,तहसीलदार रुपेशकुमार खुराणा, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , मारवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पो.उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पो.उपनिरीक्षक शरद काकडीज महावितरण नेमाडे साहेब . अमळनेर नगरपालिकेचे तुषार नेरकर इ. आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी ,पत्रकार, पोलिस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात आगामी गणेशोत्सवात कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमळनेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला. तसेच आगामी सण, उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावे तसेच गणेश मंडळासमोर जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन जातीय सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देणारे देखावे तयार करण्याचे आवाहन उपविभागीय प्रांताधिकारी अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






