पैशांचा पाऊस न पडल्याने वाद उफाळला ; गोळीबारात दोन जण जखमी
चौघांना अटक; एलसीबी आणि शिरपूर तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई
शिरपूर प्रतिनिधी;- बऱ्हाणपूर सह खंडवा येथीलचौघांनी तालुक्यातील पळासनेर येथील जंगलात पैशांचा पाऊस पडला नसल्याने झालेल्या वादातून गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची घटना 14 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस यांनी संयुक्त कारवाई करीत बराणपुर आणि खंडवा येथील चौघांना अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे राहणारा गुलजार सिंग पारसिंग पावरा याने पैशांचा पाऊस पाडेल असे गणेश रामदास चौरे याला सांगितल्याने त्याचे साथीदार शिवा सिताराम पावरा हे पळस्नेरच्या जंगलात 14 रोजी साडेआठ वाजता पोहोचले. यानंतर गणेश चौरे यांनी गुलजार सिंग याला दीड लाख रुपये दिले .मात्र पैशांचा काही पाऊस पडलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला. तसेच यावेळी दिलेले पैसे मागितले असता 50 हजार रुपये मिळत असल्याचे पाहून वादात आणखी ठिणगी उडाली. त्यामुळे गणेश चौरे यांच्या सोबत असणाऱ्या एकाने गावठी पिस्तुलातून गोळी झाडून झालेल्या घटना दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी धुळ्यात रुग्णालयात आणल्यावर पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गणेश रामदास चौरे वय 30 बऱ्हाणपूर, रतिलाल गणपत तायडे वय 50 बऱ्हाणपूर, अंकित अनिल तिवारी वय 25 खंडवा, आणि विशाल सिंग कश्यप वय 39 रा खंडवा या चौघांना अटक केली.
ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपाधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, नितीन दिवसे, मयूर पाटील, संजय सुरसे, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे धनराज गोपाल, इस्रार फारुकी, मनोज नेरकर, गुरुदत्त बडगुजर आदींच्या पथकाने केली.