Crime

शिरूर शहरात मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा छडा, शिरूर पोलिसांची  कारवाई

शिरूर शहरात मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा छडा, शिरूर पोलिसांची  कारवाई

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली होती. मात्र, शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वेळीच हस्तक्षेप करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून, तब्बल पाच गुन्ह्यांचा यशस्वी पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दि. १५ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, शिरूर गावातील गुजरमळा येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम साइटवरून सुमारे ६५ हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकाने सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांनी आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापूर – सध्या रा. शिरूर) याला ताब्यात घेतले.

पोलिसी तपासादरम्यान, अटक करण्यात आलेल्या आर्यन पवार याने आपल्या साथीदार रोहित भोसले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) याच्यासह शिरूर शहरातून मे महिन्यात चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम 379 अन्वये कारवाई करण्यात आली असून, सर्व चोरी केलेल्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

या यशस्वी कारवाईत पोसई शुभम चव्हाण, पो.ह. नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, अं. नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे विशेष योगदान राहिले.

या कामगिरीचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कौतुक करत तपास आणखी काटेकोरपणे पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button