शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई एक दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर

शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई एक दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव: प्रतिनिधी ;– शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई बुधवार, २३ एप्रिल २०२५ रोजी एक दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख संजयही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांनी दिली.
दौऱ्याच्या सुरुवातीस सकाळी ११ वाजता ते चाळीसगाव येथील प्रबोधनकार ठाकरे आश्रम शाळेत बंजारा समाजाच्या वतीने आयोजित अहिंसा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी ४.३० वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे आयोजित शिवसेना जिल्हा बैठकीत ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीनंतर संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर ते माध्यमांशी संवाद साधतील.