Crime

धक्कादायक : जळगावात तयार होत होती नकली दारू, एकाला अटक

महा पोलीस न्यूज । दि.७ जानेवारी २०२४ । जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नकली दारूचा कारखाना चालवण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वैद्यनाथ भाट याला त्याच्या घरामागे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी नकली दारू तयार करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.५ जानेवारी रोजी मध्यरात्री पोलिसांनी छापा मारून जितेंद्र भाटच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, रसायने आणि दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालात टॅंगो पंच, मॅकडॉल, रॉयल स्टॅग यांसारख्या ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्यांसह हजारोंच्या संख्येने खाली दारूच्या बाटल्या आणि रसायने सापडली.

मानवी जीवनास धोका, दोन दिवस कोठडी
बनावट दारू मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, ती घातक रसायनांचा वापर करून तयार केली जात होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जितेंद्र भाटला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आली आहे.

पोलिस आता या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याची चौकशी करीत आहेत. तसेच, जितेंद्र भाटने ही रसायने कुठून आणली आणि ही बनावट दारू कोणाला विक्री करीत होता, याचाही तपास करीत आहे.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रमोद ठाकूर, रूपाली खरे यांच्या पथकाने केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button