Other

शिरसगाव येथे शिवराज्यस्व समाधान शिबिर यशस्वीतेने संपन्न

शिरसगाव येथे शिवराज्यस्व समाधान शिबिर यशस्वीतेने संपन्न

1416 लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ

चाळीसगाव – दिनांक 26 जून 2025 रोजी शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारले होते. आमदार चव्हाण यांनी स्टॉलची पाहणी करताना अधिकाऱ्यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या.

हजारो नागरिकांना संबोधित करताना त्यांनी समाधान शिबिरांचे महत्त्व स्पष्ट केले. शासनाच्या वतीने नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात यापूर्वी झालेली समाधान शिबिरे यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.

शिबिरात विविध दाखले, शिधापत्रिका, दुरुस्त सातबारे तसेच इतर लाभांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते. एकूण 1416 लाभ थेट लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, तसेच विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सरपंच, पंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button