एसएमबीटी हाॅस्पीटल व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

एसएमबीटी हाॅस्पीटल व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
भडगाव – प्रतिनिधी
आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भडगाव तालुक्यातील व शहरातील रुग्णांसाठी एसएमबीटी हॉस्पिटल व जय हिंद लोकसळवळ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 सकाळी दहा वाजता मारुती मंदिर वरची पेठ भडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या भव्य तपासणी व उपचार शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. या तपासणी दरम्यान
मेडीसिन उच्च रक्तदाब, मधुमेह, थकवा येणे, चक्कर येणे, सततची डोकेदुखी, छातीत दुखणे,सर्जरी हर्निया, हायड्रोसिल,आतड्यांच्या शस्त्रक्रिया,स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया,अपेंडिक्स, मूळव्याध,पित्ताशयातील खडे, भगंदर,स्त्रीरोग मासिक पाळीचे आजार,नैसर्गिक प्रसूती, गर्भपिशवीच्या व अंडाशयाच्या गाठींचा आजार,कान-नाक-घसा थायरॉईड, कानाच्या फाटलेला पडदा, नाकाच्या वाढलेल्या हाड,जुनाट सर्दी इ.नेत्ररोग* तिरळेपणा,मोतीबिंदू,रात आंधळेपणा,दृष्टी कमी होणे, एकाच डोळ्यात दुहेरी दृष्टी आधी आजारांसह इतर आजारांवरही मोफत तपासणी व उपचाराची सुविधा ही मोफत या शिबिरात मिळणार आहे. शिबिराचा कार्यक्रम दि. शुक्रवार,दि. 26 सप्टेंबर 2025
सकाळी 11वा.मारुती मंदिर वरची पेठ,भडगाव या ठिकाणी होणार आहे तरी भडगाव तालुक्यातील व शहरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






