Crime

सोशल मीडियावर ओळख, हॉटेलमध्ये फोटो , व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

सोशल मीडियावर ओळख, हॉटेलमध्ये फोटो , व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

जळगाव | प्रतिनिधी

इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून तरुणीसोबत जवळीक साधत तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत २३ वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्वजित विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एका तालुक्यात राहत असलेली तरुणी उच्च शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर तिची ओळख सिसोदे याच्याशी झाली. सोशल मीडियावरील संवादानंतर त्याने तिला जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे दोघांची भेट झाली असता, सिसोदेने तरुणीसोबत फोटो आणि व्हिडीओ काढले.

यानंतर या फोटो आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट तिच्या पालकांना दाखवण्याची धमकी देत त्याने अजिंठा चौफुली परिसरातील हॉटेल ” मध्ये तरुणीवर अत्याचार केला. अत्याचार करत असतानाचे व्हिडीओही सिसोदेने तयार केले आणि ते तिच्या वडिलांना व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.

इतकेच नव्हे तर तरुणीच्या वडिलांनाही सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सततच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीने अखेर २६ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून सिसोदेविरुद्ध बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button