Detection

दमदार कामगिरी : दाऊद, भासा, अशोक एक वर्षासाठी स्थानबद्ध

महा पोलीस न्यूज | १ जून २०२४ | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरुच आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेत १ वर्षासाठी कारागृहात पाठविले आहे. शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख वय २४ रा.अमळनेर, अशोक वाळू कोळी वय ३६ रा.समता नगर, भूषण ऊर्फ भासा विजय माळी वय २४ रा.तुकाराम वाडी यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

रामानंदनगर पोलिसांची कारवाई
जळगाव जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक वाळू कोळी वय ३६ रा.साईबाबा मंदिर जवळ समतानगर, जळगाव ता. जि. जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए प्रस्ताव रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/एमपीडीए/१८/२०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. संपूर्ण कामगिरी रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहा.पो.निरी. विठ्ठल पाटील, पोहेकों संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, इरफान मलीक, रेवानंद साळुखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार अशांनी मध्यवर्ती कारागृह, मुंबई जि.मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलिसांची कारवाई
एमआयडीसी पो.स्टे.हद्दीतील स्थानबध्द भूषण ऊर्फ भासा विजय माळी वय २४ रा.भई काटयाच्या मागे तुकाराम बाडी जळगाव ता. जि. जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.२१ मे रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० एम रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र कावि/एमपीडीए २१/२०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. स्थानबंध्द इसमास एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोउनि.दिपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दतात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, किशोर पाटील, पोकों छगन तायडे, राहुन रगडे, विशाल कोळी, किरण पाटील अशांनी दि.३१ मे रोजी ताब्यात घेतले आहे. स्थानबध्द इसमाला मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर जि. कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर पो. स्टे. हद्दीतील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख वय २४ रा. पिंपळे रोड, संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत २७ गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए प्रस्ताव हा अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तयार करून प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.१ मे रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० मे रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कडील आदेश क्र.वंडप्र कावि/एमपीडीए/१९/२०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. स्थानबद्ध इसमाला अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहा.पो.निरी.अजित साळवे, पोहेको किशोर पाटील, पोको चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे अशांनी १ जून रोजी ताब्यात घेतले आणि मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि.ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.

एमपीडीए कायद्याची व्याप्ती
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे बिना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) बाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “धोकादायक व्यक्ती” या सज्ञेत मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येते. शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख याच्यावर वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी सुध्दा त्याचे वर्तनात सुधारणा झाली नसून त्याने पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरुच ठेवली. दुसऱ्यांदा त्याचवर कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण कारवाईत पथकाची प्रमुख भूमिका
सर्व एम.पी.डी.ए.प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एलसीबी पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button