Crime

देवेंद्र नगरमध्ये महिलेची आत्महत्या, पोलिसांत नोंद

देवेंद्र नगरमध्ये महिलेची आत्महत्या, पोलिसांत नोंद

जळगाव : शहरातील देवेंद्र नगर परिसरात रविवारी (२६ मे) दुपारी शबना जावेद तडवी (वय ४४) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, रामानंद नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घटनेनंतर नातेवाइकांनी शबना तडवी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button