
जळगाव प्रतिनिधी I विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे महिला वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी दि. २१ रोजी व्यसनमुक्ती व महिला सशक्तिकरण या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता.
सदरील कार्यक्रमांमध्ये डॉक्टर लीना पाटील यांनी व्यसन मुक्ती या विषयाबद्दल मार्गदर्शन केले.
यामध्ये सांगताना असे म्हटले की सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये वाढत चाललेले व्यसन ही खूप मोठी चिंताजनक बाब भविष्यात उभे राहू शकते अशी खंत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.
या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी व डॉ. मनिषा जगताप यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच हरिता विसावे प्रिया महाजन वेदिका चौधरी जयश्री महाजन आस्था पाटील वैशाली जोशी ज्योती नवाल अमृता सोनवणे कविता नाईक यांनी उपस्थित होते.






