OtherCrime

शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान वर्गातच शिक्षकाची आत्महत्या; पाचोऱ्यात खळबळजनक घटना

शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान वर्गातच शिक्षकाची आत्महत्या; पाचोऱ्यात खळबळजनक घटना

पाचोरा : पाचोरा येथील सुपडू भादू पाटील शाळेत बुधवारी सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. या शाळेतील शिक्षक रवींद्र भरत महाले (वय ४२) यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात परतले असता त्यांना महाले सरांनी गळफास घेतलेली अवस्था दिसली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ इतर शिक्षकांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

रवींद्र महाले हे पाचोऱ्याजवळील दहीगाव संत येथे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगीसोबत वास्तव्यास होते. त्यांनी आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button