धक्कादायक : पुन्हा पोलीस अधिकाऱ्याने संपविले जीवन

महा पोलीस न्यूज | ९ मार्च २०२४ | महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सध्या सत्रच सुरू आहे. एकाच महिन्यात दोन अधिकाऱ्यांनी जीवन संपविल्याची घटना ताजी असताना आणखी एका अधिकाऱ्याने जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे. सुभाष दुधाळ असे मयताचे नाव आहे.
बीड पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. रात्री घटना केव्हा घडली याबाबत माहित नसून सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे.
परळी येथील घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गेल्या महिनाभरात तीन अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नाशिक येथे पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन, उल्हासनगर येथे सहाय्यक निरीक्षकाने गळफास घेत जीवन संपविले होते. पोलीस दलातील घटनेने समाजमन सुन्न झाले असून पोलिसांचे मानसिक समुपदेशन करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.