सुकळी येथील विद्यालयाचे चक्क गुरचरणच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप; तहसीदाराकडे तक्रार

सुकळी येथील विद्यालयाचे चक्क गुरचरणच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप; तहसीदाराकडे तक्रार
महा पोलीस न्युज |सुभाष धाडे| दि 20जाने 26
मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथील ग्रामपंचायत ताब्यातील गुरचरण जागा गट क्र 119 अंदाजे 5 हेक्टर वर परिसरातील एका खाजगी शिक्षण संस्थने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता जबरदस्तीने अतिक्रमण करीत शाळेची निर्मिती केली आहे. याप्रकरणी समाजसेवक शिवाजी वानखेडे यांनी ग्रामप्रसाशनास वेळोवेळी तक्रारी दिल्या मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने मुक्ताईनगरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार दिली असून, तक्रारीत म्हटल्याप्रमाणे परिसरातील रामदेव बाबा बहू उद्देशीय संस्था यांच्या अधक्ष्य व सचिवाने ग्रामपंचायत अथवा इतर कोणतीही शासकीय परवानगी न मिळविता बेकायदेशीरपने जबरदस्ती ग्रामपंचायत सुकळी यांचे कब्जातील गट क्र 119 या जागेवर अतिक्रमण करीत शाळा उभारली आहे.
तरी यासंदर्भात सदर अतिक्रमित संस्थेच्या अध्यक्ष्यासह सचिवावर कारवाई करण्यात येऊन सदर जागेतील अतिक्रमण काढण्यात यावे. असे दिलेल्या निवेदनात तक्रारदार वानखेडे यांनी म्हटले आहे.
सन 1956-57 ला गट न 119 ही जमीन जिल्हाधिकारी यांनी अटी शर्तीस पात्र राहून ग्रामपंचायत सुकळी यांच्या ताब्यात दिली होती. कालांतराने गुरचरण असलेल्या या जागेवर तालुक्यातील टाकळी येथील रामदेव बाबा बहू उद्देशीय शिक्षण संस्थे ने नियमानुसार कोणतीही परवानगी न मिळविता यां ठिकाणी विद्यालयाची उभारणी केली. या विद्यालयातील एक शिक्षक ग्रामपंचायत मध्ये सदस्य तसेच राकरणात सक्रिय असल्याने या संदर्भात काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे.
यासंदर्भात वानखेडे यांनी ग्रामपंचायत कडे तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नसल्याने तहसीलदार मुक्ताईनगर यांचेकडे दाद मागितीली आहे.
दरम्यान याबाबत शाळेच्या सूत्रांकडून भ्रम्हणध्वनीद्वारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.





