स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचे रक्षाबंधन…!

भडगांव (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय सैन्य दलातील सैनिक व माजी सैनिकांप्रती बंधूभाव जोपासत शेतकरी संघाच्या संचालिका तथा माजी नगरसेविका योजना पाटील यांनी माजी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मातृभूमीचे रक्षण करतांना आपला परिवार तसेच जन्मभूमीत साजरे होणारे सार्वजनिक उत्सवापासून वंचित रहावे लागते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत योजना पाटील यांनी बहिणीची भूमिका बजावत शहर तालुक्यातील सैनिक व माजी सैनिकांचे औक्षण करून राखी बांधून बंधुभाव जोपासला. ड्युटीवर असतांना आम्ही सण उत्सवापासून वंचित राहत होतो ते सदर उपक्रमाद्वारे भरून निघाले असे मत माजी सैनिक संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी भावनिक होत भारत मातेची कर्तव्य सेवा प्रती आदराचा आनंद व्यक्त केला. प्रातिनिधिक स्वरूपात माजी सैनिक डी. डी. पाटील यांनी आभार मानले.






