३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व
रत्नागिरी द्वितीय तर अमरावतीने तृतीय क्रमांकाने विजयी
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तथा दहावी पुमसे राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला व तृतीय क्रमांक अमरावती जिल्हा तर पुमसे याप्रकारात पालघर जिल्हा प्रथम क्रमांक, द्वितीय रत्नागिरी, तृतीय सब मुंबई यांनी पटकाविले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलांमध्ये ठाण्याचा शक्ती दाभाडे तर मुलींमध्ये दुर्वा गुरव विजयी ठरलेत.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन जैन इरिगेशनचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे तसेच उपाध्यक्ष दुलीचद मेश्राम, कोषाध्यक्ष वेंकटेश करा तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, रविंद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२८ विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेत यात १४ मुले व १४ मुली सुवर्णपदक विजेते यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू मुले
१) १६ किलो आतील सार्थक गमरे ( रत्नागिरी ) २) १८ किलो आतील श्लोक बांदल ( पुणे ) ३) २१ किलो आतील यथार्थ कांबे ( अमरावती ) ४) २३ किलो आतील रूद्र जाधव ( मुंबई ) ५) २५ किलो आतील ध्रुव वारूडकर ( अमरावती ) ६) २७ किलो आतील सोहम वडासकर ( अमरावती ) ७) २९ किलो आतील सोहम खामकर ( रत्नागिरी ) ८) ३२ किलो आतील ध्रुवराज शिंदे ( पुणे ) ९) ३५ किलो आतील शक्ती दाभाडे ( ठाणे ) १०) ३८ किलो आतील मंथन आंबेकर ( रत्नागिरी ) ११) ४१ किलो आतील आदित्य नाहक ( सब-मुंबई) १२) ४४ किलो आतील सार्थक कोलते ( छत्रपती संभाजी नगर) १३) ५० किलो आतील यश चौहान ( पुणे ) १४) ६० किलो आतील अर्थव मुरकुटे ( पुणे )
सुवर्णपदक विजेत्या मुली
१) १४ किलो आतील प्रिशा कलवणकर ( मुंबई ) २) १६ किलो आतील अदिरा कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर) ३) १८ किलो आतील अंतरा कश्यप ( मुंबई ) ४) २० किलो आतील दुर्वा गुरव ( मुंबई ) ५) २२ किलो आतील आर्या होले ( पुणे ) ६) २४ किलो आतील स्वाती भोसले ( अहिल्या नगर ) ७) २६ किलो आतील श्रिया पाडवे ( मुंबई ) ८) २९ किलो आतील सिद्धी मिसाळ ( बिड ) ९) ३२ किलो आतील स्वरा येवले ( पुणे ) १०) ३५ किलो आतील स्वाती जैस्वाल (रायगड) ११) ३८ किलो आतील नभा यावलकर ( अमरावती ) १२) ४१ किलो आतील अनन्या काळे (अमरावती) १३) ४७ किलो आतील ईश्वरी रोडे (अहिल्यानगर) १४) ५७ किलो आतील ज्ञानेश्वरी गाभने (अमरावती) या सर्व खेळाडूंची हरियाणा (पंचकुला ) येथे होणार असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विजेत्यांचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, प्रविण बोरसे, निरज बोरसे, खजिनदार व्यंकटेश करा, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, ललित पाटील, सुरेश खैरनार, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, पुष्पक महाजन, दानिश तडवी, लोकेश महाजन, दिनेश , ऋशिकुमार खारोळे, जयेश कासार, विष्णू झाल्टे, निकेतन खोडके, निकिता पवार, सिमरन बोरसे आदिचे सहकार्य लाभले.