Education

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ८१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव

महा पोलीस न्यूज । दि.१३ सप्टेंबर २०२५ । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई) ची स्थापना १९४४ मध्ये झाली असून, “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीदवाक्याला अनुसरून गेल्या ८१ वर्षांपासून शिक्षण प्रसाराचे कार्य अविरतपणे करीत आहे. या संस्थेचा ८१ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता केसीईच्या प्रांगणात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रथमच, केसीईच्या सर्व शाखा एकाच दिवशी, एकाच वेळी त्यांच्या प्रगतीचा आणि कार्याचा आढावा घेतील.

या कार्यक्रमात एकूण १७ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक दाखवणारी चित्रफीत सादर केली जाणार आहे. कार्यक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, उपकुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे विशेष अतिथी म्हणून हजर राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीईचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.

केसीई सोसायटीने मागील पाच वर्षांत आयएमआर, अभियांत्रिकी, मुलांचे वसतिगृह, लॉ कॉलेज आणि ५०० प्रेक्षक क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, संस्था आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान यासारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रदान करीत आहे.

या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, डी.टी. पाटील, प्रा. मृणालिनी फडणवीस, शशिकांत वडोदकर आणि प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते. हा कार्यक्रम केसीईच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button