Social
अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाच्या भडगाव शहराध्यक्षपदी रियाज खाटीक

भडगाव प्रतिनिधी : अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाच्या भडगाव शहर अध्यक्षपदी रियाज हाजी मुनाफ खाटीक उर्फ सोनू शेठ यांची निवड नुकतीच झाली आहे.
ही निवड भडगाव येथे झालेल्या बैठकीत एकमताने झाली. तसेच सचिव पदी शहीद लतीप खाटीक उपाध्यक्ष -मक्सुद गुलाब खाटीक, खजिनदार इम्रान आमद खाटीक,संघटक अमजद सलीम खाटीक, सह सचिव साबीर खाटीक यांच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे समाजातर्फे सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.






