जळगावच्या_विघ्नहर्ता_ चे २५ रोजी भव्य आगमन सोहळा
मुख्य आकर्षण : स्वरगंगा बँड, फ़ुटाची भव्य मूर्ती

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान, जळगाव संचलित दीक्षित वाडी मित्र मंडळ, पांडे चौक, “जळगावचा विघ्नहर्ता” गेल्या दोन दिवसाला बऱ्हाणपूर वरून जळगाव येथे तब्बल २४ तासाचा प्रवास करून दाखल झालेला आहे. मंडळाची मूर्ती ही तब्बल २५ फूट आहे. सदर मूर्ती बराणपुर चे प्रसिद्ध मूर्तिकार अतुल वैद्य यांनी साकार केली आहे
दीक्षित वाडी मित्र मंडळ हे पूर्वीच्या मोजक्या जुन्या मंडळांपैकी एक असून मंडळाला ५५ वर्ष पूर्ण होत आहे. मंडळाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याची भूमिका ठामपणे बजावली आहे यासोबतच दरवर्षी सजीव देखावे जनजागृती इत्यादी कार्यात मंडळाचा पुढाकार असतो.
दरवर्षी स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान, जळगाव संचलित दीक्षित वाडी मित्र मंडळ, पांडे चौक, जळगावचा विघ्नहर्ता च्या आगमन सोहळ्याचे जळगावकरांना आकर्षण असते. यावर्षी देखील मंडाने सुप्रसिद्ध असलेला स्वरगंगा बँड लावण्यात आला असून जळगावकर या आगमन सोहळ्याच्या प्रतीक्षेत आहे.
जळगावचा विघ्नहर्ता या इंस्टाग्राम अकाउंट वरून मंडळाचे येणारे विविध रिल्स हे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असून आजच्या डिजिटल युगात विविध मंडळांची देखील स्पर्धा बघायला मिळत आहे.
तरी या आगमन सोहळ्याला जळगावकरांनी उपस्थित राहण्याची आव्हान मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*भव्य आगमन सोहळा*दिनांक :-25 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता.ठिकाण :- छ. शिवाजी महाराज चौक (कोर्ट चौक) ते पांडे चौक






