ग्रामीण भागात तातडीने ग्रामशेत रस्ता समिती स्थापन करा
राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामीण भागात तातडीने ग्रामशेत रस्ता समिती स्थापन करा
राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समिती स्थापनेचे तातडीने आदेश देऊन ती समिती स्थापन व्हावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समिती भडगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुका हद्दीतील सर्व गावांमध्ये गाव तसेच ग्रामपंचायत स्थरावर ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करून ती कार्यन्वित करणे गरजेचे आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने तसा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. सदर शासन निर्णय क्र.मग्रारो-२०२१/प्र.क्र. २१/रोहया १०अ दि.११/११/२०२३ पारनेर तालुका शेतपाणंद रस्ते हे शासन निर्णयामध्ये नमुद केलेप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर आराखडा ग्रामविकास अधिकारी यांनी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे
त्यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करून तीचा रस्त्यांबाबतचा सातत्याने अहवाल घेणे गजरेचे आहे.सदर ग्रामशेतरस्ता समिती कुठल्याच गावामध्ये कार्यान्वित नसल्याने बहुतांश गावांमध्ये रस्त्यांचे बाद मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न होत आहे. सदरचे वाद ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करून गाव पातळीवरच मिटविण्यात यावेत. असे शासन निर्णयानुसार शासनाने सांगितलेले आहे.
सबब आपणांस विनंती की, ७ दिवसांच्या आत मध्ये समिती स्थापन करून त्यामार्फत कामकाज चालु करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले यावेळी शरद पाटील राजेंद्र पाटील,शांताराम पाटील ,श्रावण जा. दिनकर पाटील, निळकंठ पाटील, गुलाब पाटील आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.