अल्पवयीन मुलगी सामूहिक अत्याचारातून झाली गर्भवती ; तिघांना अटक

अल्पवयीन मुलगी सामूहिक अत्याचारातून झाली गर्भवती ; तिघांना अटक
चाळीसगाव तालुक्यातील घटनेने खळबळ
जळगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह गावातील आणखी दोघांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली असून, आरोपींनी व्हिडिओ काढून तो गावात व्हायरल देखील केला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या चुलत भावाने तिला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि कोणालाही न सांगण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर गावातील दोन आरोपी नाना दीपक मोरे आणि पवन रावसाहेब मोरे यांनी ती घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर घरातच अत्याचार केले आणि त्या कृत्याचा व्हिडिओ काढून गावात व्हायरल केला.
या अमानुष अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. या गंभीर घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करत आहेत.






