Gold-Silver Rate
Gold-Silver Rate | दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्यात वाढ, चांदीने गाठला नवा टप्पा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । उद्या दसरा सण असून त्याआधीच सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात आज वाढ झाली असून चांदीनेही नव्या उच्चांकावर मजल मारली आहे.
आजच्या दरानुसार २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०७,४५० तर कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१७,३०० आणि चांदी ₹१,४७,००० प्रति किलो आहे.
नवरात्रोत्सवाच्या अखेरीस व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुभमुहूर्ताची खरेदी सुरू झाली आहे. बाजारपेठेत लग्नसराईच्या ऑर्डर्ससह दागिन्यांची मागणी वाढली असून ग्राहक विशेषतः सोन्या-चांदीच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
भंगाळे गोल्डमध्ये सध्या ग्राहकांसाठी दसरा-दीपावली निमित्त खास ऑफर्स, शुद्धतेची हमी आणि आधुनिक डिझाईन्समुळे चांगली गर्दी दिसून येत आहे.




