चाळीसगाव येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । अंधारी येथील माध्यमिक विद्यालय आणि हिरापूर येथील रा.स.शि. मंडळ चाळीसगाव संचलित माध्यमिक विद्यालयात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा, व्यसनमुक्ती, सेल्फ डिफेन्स आणि वाहतूक नियमांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री.मुटेकर यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वतःची सुरक्षा कशी राखावी, सेल्फ डिफेन्स तंत्र, व्यसनमुक्ती, वाहतूक नियमांचे पालन, पोक्सो कायदा आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी मुलींना विशेषतः गुड टच आणि बॅड टच याबाबत जागरूकता, तसेच कराटे आणि ज्युडो यांसारख्या आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शाळांनी मुलींसाठी अशा प्रशिक्षणांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीच्या वेळी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन मुटेकर यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवरे, शिक्षक रवींद्र रणदिवे, पत्रकार व शिक्षक सुधीर देवरे, पर्यवेक्षक संजय राठोड, उपसरपंच प्रफुल्ल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि भूषण पाटील उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.