शिरपूर तालुक्यात पोलिस वाहनाचा अपघात; अंमलदार ठार, दोन जखमी

शिरपूर तालुक्यात पोलिस वाहनाचा अपघात; अंमलदार ठार, दोन जखमी
धुळे – शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर दहिवद गावाजवळ सोमवारी सकाळी पोलिसांचे बोलेरो वाहन (क्र. MH18 BX 0232) भीषण अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत पोलीस अंमलदार नवल वसावे यांचा मृत्यू झाला असून प्रकाश जाधव व अनिल पारधी हे दोन अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत.
महामार्ग वाहतूक शाखेचे बोलेरो वाहन गस्तीसाठी जात असताना अचानक मागील टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले व बोलेरो महामार्गावर पलटी झाली. अपघातानंतर वाहन पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले. तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान नवल वसावे यांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून वाहनांच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपघाताचा पंचनामा करून शिरपूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.






