‘त्यांना’ जनताच निपटून घेईल : अनिल चौधरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । कुणालाही निपटून घेण्याची भाषा आम्ही करत नाही. भुसावळला मंत्री संजय सावकारे यांनी निपटून घेण्याची भाषा केली तर जनतेनेच त्यांना निपटून घेतले. संजय सावकारे यांनी केलेले चुकीचे वक्तव्य त्यांना भोवले. आम्ही जळगावात कुणाला निपटण्यासाठी आलेलो नाही, लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आलो आहोत, असे अनिल चौधरी यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची गुप्त बैठक जळगावातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आली. बैठकीत बंदद्वार चर्चा झाली. संतोष चौधरी आणि अनिल चौधरी पुढील ३ दिवस जळगाव शहरात मुक्कामी असून निवडणुकीच्या दृष्टीने भेटीगाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे.
‘महा पोलीस न्यूजसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही कुणाचाही अपमान करत नाही, सर्वांचा सन्मान करतो. निपटून घेण्याची भाषा आम्ही करत नाही, जनताच सर्वांना निपटून घेते. मैदानात उतरल्यावर आम्ही माघार घेत नाही. जळगाव मनपा निवडणुकीसाठी आमची संपूर्ण तयारी असून सर्वांशी विचार विनिमय करून आम्ही नवीन दमदार चेहरे मैदानात उतरवणार आहोत. महापौर आमचा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.






