HAM अंतर्गत सावखेडा-धरणगाव हायवेच्या विकासाने या भागाचा चेहरामोहरा बदलेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

HAM अंतर्गत सावखेडा-धरणगाव हायवेच्या विकासाने या भागाचा चेहरामोहरा बदलेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
सावखेडा/धरणगाव प्रतिनिधी,: सावखेडा ते धरणगाव हायवे हा केवळ एक रस्ता नसून, या भागातील जनतेसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होईल, तसेच हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित असून, रस्ता दर्जेदार आणि वेळेत कॉन्ट्रॅक्टरने पुर्ण करा. दळणवळणाचे साधन म्हणजे विकासाची गती असून हा रस्ता या भागातील शेती, व्यापार आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल. त्यामूळे दर्जेदार रस्त्यामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*
धरणगाव येथे आयोजित भूमिपूजन समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य शासनाच्या निधीतून सावखेडा-धरणगाव हायवेच्या 110 कोटींच्या 20 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विभागाचे कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम, ठेकेदार ललित चौधरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास पमाळी सर यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम यांनी मानले.
या रस्त्याच्या भूमिपूजनामुळे भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, भाजपाचे सुभाषअण्णा पाटील, शेखर अत्तरदे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, डी. जी. पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, ऍड संजय महाजन, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, शहर प्रमुख विलास महाजन, नपाचे गट नेते पप्पू भावे, भाजपचे कैलास माळी सर, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, बुट्या पाटील, भगवान महाजन, अनिल पाटील,. भानुदास विसावे, राजेंद्र पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.