
जळगाव (राकेश वाणी): येथील मिथिला सार्वजनिक मित्र मंडळाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. “मिथिलाचा राजा” म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
संपूर्ण गणेश उत्सवात संगीत खुर्ची, निंबू चमचा, ग्रीन लाईट रेड लाईट, बलून शूट, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मुले तसेच महिला व पुरुष मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवाला होता.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी सोसायटीमधील कर्तव्यदक्ष महिला शिक्षिका देवयानी वाणी आणि भाग्यश्री ज्ञाने यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मिथिला सोसायटीचे अध्यक्ष संजय पारस्कर, उपाध्यक्ष अश्विन उमाळे, सचिव विक्रम सोनार, खजिनदार विजय चव्हाण, कार्याध्यक्ष हेमंत अटवाल, तसेच जोगेश्वर काटोले, नारायण गोराणे, किरण कोंडाळकर, दामू पाटील, बंडू मुंदडा, मोहित माथुरवैश्य, विपीन शिरोळकर, निलेश पाटील, विवेक ज्ञाने, योगेश अटल, गणेश महाजन, ज्ञानेश्वर वाणी, मनोज बडगुजर, मयूर पाटील,हरीश साळुंखे, योगेश निंबाळकर, राजेंद्र सैनी, हेमंत कुलकर्णी, अजय वासकर अक्षय गोसावी, सागर पाटील, अक्षय काळे, हर्षल पारस्कर, नीरज तिवारी, मेहुल भोळे, विवेक जाधव यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना मंडळाचे उपाध्यक्ष अश्विन उमाळे यांनी पुढील वर्षी पर्यावरणपूरक देखावा आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.






