फैजपूर नगरपालिकेवर भाजपाची सत्ता

फैजपूर नगरपालिकेवर भाजपाची सत्ता
नगराध्यक्षपदी दामिनी पवन सराफ यांचा विजय; प्रभागनिहाय निकाल जाहीर
फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या दामिनी पवन सराफ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सराफ यांनी १०,०८७ मते मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत निकाल जाहीर केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नगराध्यक्षपदासह प्रभागनिहाय निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, अपक्ष तसेच एमआयएमलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक १-अ मधून राष्ट्रीय काँग्रेसचे हकीम एमत तडवी (१,८३७ मते) विजयी झाले, तर १-ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या शेख सुमैय्या बी. कुरबान (१,८२७ मते) यांनी यश मिळवले.
प्रभाग २-अ मधून एमआयएमचे शेख युनूस शेख अयुब (१,३९२ मते) विजयी ठरले, तर २-ब मधून काँग्रेसच्या शेख सादिका शेख दानिश (१,५६६ मते) यांनी बाजी मारली.
प्रभाग ३-अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शेख अन्वर शेख असगर हे बिनविरोध निवडून आले, तर ३-ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सफूरा बी. महेमूद यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
प्रभाग ४-अ मधून भाजपाच्या दीपाली जितेंद्र भारंबे (७३६ मते) विजयी झाल्या, तर ४-ब मधून अपक्ष विनोद अरुण चौधरी (९६९ मते) निवडून आले.
प्रभाग ५-अ मधून काँग्रेसचे केतन डिगंबर किरंगे बिनविरोध निवडून आले, तर ५-ब मधून भाजपाच्या निलिमा महाजन यांनीही बिनविरोध विजय मिळवला.
प्रभाग ६-अ मधून भाजपाच्या जयश्री नरेंद्र चौधरी (१,१०३ मते) विजयी झाल्या, तर ६-ब मधून भाजपाचे सागर होले बिनविरोध निवडून आले.
प्रभाग ७-अ मधून काँग्रेसच्या प्रियंका ईश्वर इंगळे (८३१ मते) विजयी ठरल्या, तर ७-ब मधून भाजपाचे महेंद्र अशोक मंडवाले (१,४५३ मते) यांनी यश संपादन केले.
प्रभाग ८-अ मधून भाजपाच्या सुनिता अनंत नेहेते (९९६ मते) विजयी झाल्या, तर ८-ब मधून काँग्रेसचे शेख ईरफान शेख इकबाल (९९१ मते) निवडून आले.
प्रभाग ९-अ मधून भाजपाच्या निकिता प्रकाश कोळी (१,३५६ मते) आणि ९-ब मधून भाजपाचे सुरज रमेश गाजरे (९४७ मते) विजयी ठरले.
प्रभाग १०-अ मधून भाजपाचे सिद्धेश्वर वाघुळदे बिनविरोध निवडून आले, तर १०-ब मधून भाजपाच्या भावना संदीप भारंबे (५३९ मते) विजयी झाल्या.
प्रभाग १०-क मधून अपक्ष अमिता हेमराज चौधरी (६८१ मते) यांनी विजय मिळवला.
पक्षनिहाय संख्याबळ
फैजपूर नगरपरिषदेत एकूण जागावाटप पुढीलप्रमाणे झाले आहे —
भाजपा : ९,
काँग्रेस : ५,
अपक्ष : ३,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २,
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : १,
एमआयएम : १.
नगराध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने फैजपूर नगरपालिकेतील सत्ता स्पष्ट झाली असून, आगामी काळात नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






