Gold-Silver Rate | चांदीत पुन्हा ४,५०० रुपयांची उसळी; सोन्याचे दरही वाढीच्या मार्गावर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सवामध्ये सोनं-चांदीचे दर सातत्याने वाढीच्या मार्गावर आहेत. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार, आज पुन्हा दरवाढ झाली असून विशेषतः चांदीच्या भावात तब्बल ४,५०० रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०४,६००, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१४,२०० झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर ₹१,४४,००० प्रति किलो वर पोहोचला असून, हा गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक दर ठरला आहे.
गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात स्थिरता जाणवत असली तरी चांदी मात्र मोठ्या झेपेसह उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. नवरात्रोत्सवाबरोबरच आता ग्राहक दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी तयारी करत आहेत. पारंपरिक शुभमुहूर्तांवर दागिने घेण्याची परंपरा असल्याने भंगाळे गोल्डमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
भंगाळे गोल्डमध्ये या उत्सवी काळात आकर्षक योजना, ऑफर्स, आधुनिक तसेच पारंपरिक डिझाईन्स आणि शुद्धतेची हमी उपलब्ध आहे. त्यामुळे सोनं-चांदीचे भाव वाढले असले तरी ग्राहक खरेदीसाठी उत्सुक आहेत.





