मेहरूणच्या बगीच्यात गांजा विक्री, १० किलो गांजा जप्त

महा पोलीस न्यूज । दि.६ मार्च २०२५ । जळगाव शहरातील मेहरुण बगीचा परिसरात एक इसम गांजा विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून त्याठिकाणी कारवाई करत ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस पथकाचे पोना प्रदीप चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम मेहरुण बगीचा परीसरात गांजा विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने मोटारसायकलवरून विक्रीसाठी फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले. पथकाने सापळा रचून कारवाई केली असता बगीच्यात मुकेश बिष्णु अभंगे (वय 43, रा. कंजरवाडा तांबापूर, जळगाव) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल ९ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकी असा १ लाख ७ हजार १३२ रुपयांचा असलेला मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, पोका चेतन पाटील हे करीत आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना प्रदीप चौधरी, पोना योगेश बारी, पोका.नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे यांच्या पथकाने केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती मिळाल्यास एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.