केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयत संगणक अभियांत्रिकी विभागात दुसऱ्या वर्ष विद्यार्थ्यांकरिता २५व २६ सप्टेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संगणक हार्डवेअर च्या विविध घटकांबद्दल तसेच त्यांचे अनुप्रयोगाविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देणे होता . सहाय्य्क प्राध्यापक श्री विकास नारखेडे व सहाय्य्क प्राध्यापक श्री नीरज कुमार पद्मे यांचे मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली . विभागप्रमुख प्रा .अविनाश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे ज्ञानवृद्धीसाठी या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी अश्या उपक्रमाचे समर्थन व प्रोत्साहन दिले . विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा उपक्रम संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांचं सर्वागीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नाचे एक महत्व पूर्ण पाऊल ठरले






