विक्की मोची खून प्रकरण : आणखी दोन संशयीत आरोपींना पकडले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जुन्या वादातून झालेल्या भांडणातून विशाल उर्फ विक्की रमेश बसवाल (मोची) (वय २६, रा.रामेश्वर कॉलनी) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील दिक्षितवाडी परिसरात घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले.
शहरातील तुकारामवाडी येथे राहणारा आकाश जनार्दन मोची आणि त्याचा चुलत भाऊ विशाल बसवाल हे दोघे मित्र रोहीत भालेराव यांच्यासह त्यांच्या घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी वीज गेल्यामुळे ते तिघे मोटारसायकलने एमएसईबी कार्यालयाकडे गेले होते. एमएसईबी कार्यालयाच्या गेटजवळ त्यांना गाठून काही तरुणांनी चाकूने विशालच्या मान, छाती आणि डोक्यावर वार केले. हल्ल्यात विशाल बसवाल याचा जागीच मृत्यू झाला होता.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच आकाश सुकलाल ठाकुर उर्फ खंड्या आणि भूषण रमेश अहिरे रा.पिंप्राळा यांना अटक केली होती. याप्रकरणात फरार असलेल्या पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर यास राहत्या घरून तर देव विजय पवार उर्फ देव ठाकूर यास तुकारामवाडी परिसरातून बुधवारी दुपारच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे.
संपूर्ण कामगिरी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील हवालदार मिलिंद सोनवणे, महिला हवालदार भारती देशमुख, पो.का राहुल पाटील, पो.का नरेंद्र दिवेकर, पो का प्रशांत सैंदाने, पो.का तेजस मराठे, पो.का गोविंदा साबळे, पो.का विशाल साळुंखे, पो का तुषार पाटील, पो.का जयेश मोरे, नरेश सोनवणे यांनी केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






