इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेचा दिमाखदार ठसा; शाळेला ‘गोल्डन अवॉर्ड’, प्राचार्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेचा दिमाखदार ठसा; शाळेला ‘गोल्डन अवॉर्ड’, प्राचार्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार
चोपडा । नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेच्या दुसऱ्या फेरीत विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेत शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी २०० पेक्षा जास्त विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी ‘एक्सलन्स मेडल’ मिळवत आपल्या गुणवत्ता सिद्ध केली, तर काही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर टॉप करून स्कॉलरशिपदेखील पटकावली.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वेश निलेश वानखेडे (इयत्ता १ली – इंग्रजी), अनया प्रशांत देशमुख (इयत्ता ७वी – विज्ञान), वैष्णवी विश्वेश्वर जाधव (इयत्ता ८वी – गणित), जयेश देवराज (इयत्ता ८वी – सामान्य ज्ञान), सोहम कुंदन पाटील (इयत्ता ८वी – इंग्रजी), वेद मनोज चित्रोड (इयत्ता ९वी – गणित), प्रथमेश कमलाकर पाटील (इयत्ता ९वी – विज्ञान) यांचा समावेश आहे. तर नव्या कल्पेश सुराणा (इयत्ता ८वी – विज्ञान) हिला ₹१२००, विहान अमोल मोदी (इयत्ता ६वी – गणित) व सुजल प्रदीप मुंद्रे (इयत्ता १०वी – विज्ञान) यांना प्रत्येकी ₹१००० ची स्कॉलरशिप प्राप्त झाली.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार शाळेचे विद्यमान संस्थाध्यक्ष डॉ. विकास यशवंत हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, माध्यमिक विभागाचे प्राचार्य नरेंद्र भावे आणि इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेच्या या गौरवशाली कामगिरीची दखल घेत Indian Talent Olympiad संस्थेने विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेला ‘Golden Award’ देऊन सन्मानित केले. तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री यांना ‘Best Principal Award’ देण्यात आला. याचबरोबर उत्कृष्ट विषय शिक्षक म्हणून डेल्फिन मथायस (इंग्रजी), पुनम पटले (गणित), इशरत शेख (विज्ञान) यांना गौरवण्यात आले. तर विक्की शर्मा यांना ‘Inspiring Teacher Award’ प्राप्त झाला.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या व्यवस्थापनापासून शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत सर्वांनी मिळून घडवलेल्या या यशाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.