
जळगाव – ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल, जळगाव येथे विद्यार्थी परिषदेचा शपथविधी समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला के.सी.ई. सोसायटीचे मान्यवर ॲड.प्रमोद एन. पाटील (सचिव, के.सी.ई. सोसायटी, जळगाव),ॲड.प्रविणचंद्र जंगले (सह सचिव, के.सी.ई. सोसायटी, जळगाव) डॉ. अशोक राणे (सदस्य, के.सी.ई. सोसायटी, जळगाव तथा प्राचार्य, के.सी.ई. शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जळगाव)गोकुळ पाटील (एच.आर. मॅनेजर, के.सी.ई. सोसायटी, जळगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
शपथ विधी समारंभात नवीन निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या पथसंचलनानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी परिषदेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बैज व सॅशे प्रदान करण्यात आले. परिषदेच्या सदस्यांनी उपप्राचार्या सौ. राजनी गोजोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ घेतली.
प्राचार्य श्रीधर सुनकरी व ॲड .प्रवीणचंद्र जंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय बारी, प्रतिक्षा भारंबे व संजयकुमार हिरानी यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद सदस्य विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या साळुंखे, अस्मा पिंजरी, पूर्वा घुले व देवेश पाटील या विद्यार्थ्यांनी केले.
समारोप प्रसंगी उपप्राचार्या सौ. रजनी गोजोरेकर यांनी उपस्थित मान्यवर तसेच पालक बंधू–भगिनींचे आभार व्यक्त केले.हा समारंभ शाळेचे प्राचार्य श्रीधर सूनकरी , उपप्राचार्या रजनी गोजोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडला व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, जबाबदारी व सेवाभाव दृढ झाला.






