जळगावात ACB ची मोठी कारवाई ; १५ हजारांची लाच स्वीकारताना प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अधिकारी व पंटरला रंगेहात पकडले !

जळगाव प्रतिनिधी I लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने जळगावात धाड टाकत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) व त्यांचा साथीदार खाजगी इसम मनोज बापु गजरे यांना १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
रावेर येथील एका हॉस्पिटलच्या बायो-वेस्ट प्रमाणपत्रासाठी सुर्यवंशी यांनी त्रुटी दाखवून लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून प्रमाणपत्र मिळवून घेतल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी जळगाव कार्यालयात गेले असता, सुर्यवंशी यांनी १५,००० रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केली होती.
दिनांक २४ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार खाजगी इसम गजरे यांनी तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.






