जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापतींची निवड आज

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापतींची निवड आज
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरोधात अविश्वास ठराव झाल्यानंतर त्यांनी आठवडाभरापूर्वीच जिल्हा निबंधकांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागांवर आज (दि. २९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात नवी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
सभापतीपदासाठी लकी टेलर व सुनिल महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, नेमके कोण सभापतीपदी विराजमान होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपसभापतीपदाबाबतही चर्चेला उधाण आले असून, हे पद सहा-सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रोटेशन पद्धतीने देण्यात येणार असल्याचे समजते.
यापूर्वी झालेल्या निवड प्रक्रियेला काही संचालक सहलीवर गेल्यामुळे आवश्यक फोरम नसल्याने तहकुब करावे लागले होते. अखेर आज निवडणूक पार पडत असून, यानंतर समितीला नवे नेतृत्व मिळणार आहे.






