
जळगाव माहेश्वरी जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरे
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव येथील माहेश्वरी जेष्ठ नागरिक संघटनेची त्रैमासिक सभा रविवारी, २७ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेला २२५ सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणक शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक श्री. आमले यांनी सायबर सुरक्षा या विषयावर उपस्थितांना मोलाची माहिती दिली.सभेत जुलै २०२५ मध्ये प्रस्तावित अयोध्या सहलीची माहिती सदस्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, तिमाहीतील सदस्यांचे वाढदिवस अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले, ज्यामुळे सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला.संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि सर्व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप बेहडे आणि सौ. मंगला बेहडे यांनी केले. सभेचे वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंदमय होते.