ममुराबादच्या तरुणाने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव : राहत्या घरात एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना रविवार 15 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील ममुराबाद येथे उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
योगेश उर्फ शुभम कैलास शेटे (वय २४) असे मयत तरुणाचे नाव असून तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हात मजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करणारा योगेश उर्फ शुभम याने घरात कोणीही नसताना अतुल दरवाजा लावून दोरीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. हे पाहताच त्याच्या आईने आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेत दरवाजा तोडून शुभमला खाली उतरविले. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसात करण्यात आली आहे.