ब्रेकिंग : जळगावात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार, एक तरुण जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील गोळीबारचे सत्र अद्याप थांबतच नसून सलग दुसऱ्या दिवशी गोळीबारची घटना घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात गोळीबारची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती असून जखमी तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील गोळीबारचे सत्र अद्याप थांबतच नसून सलग दुसऱ्या दिवशी गोळीबारची घटना घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात राहणारा ३१ वर्षीय तरुण एका खाजगी कंपनीत कामाला आहे. उद्या पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आई-वडिलांनी घेऊन गावी जाणार होता.
दरम्यान जखमीच्या माहितीनुसार, आज दि.३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातच घराच्या मागील बाजूला उभे असताना अचानक आलेली गोळी त्याच्या छातीत घुसली. रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे देखील जखमीच्या परिचयाच्या असल्याची माहिती आहे.






