जेवणाची पर्वा न करता, चोरीचा मालट्रक ४८ तासात शोधला
महा पोलीस न्यूज । दि.२७ जुलै २०२४ । फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक १० चाकी ट्रक चोरी झाला होता. स्थानिक गुन्हे शोध शाखा आणि फैजपूर पोलिसांच्या पथकाने दोन दिवस रात्रंदिवस ३० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मध्यप्रदेशातून पोलिसांनी ट्रक हस्तगत केला.
फैजपुर पो.स्टे.च्या हद्दीतून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात १० चाकी मालट्रक क्रमांक एमएच.१९.झेडए.५१८१ हा दोन दिवसापूर्वी चोरी झाला होता. गुन्ह्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार संदिप पाटील, महेश महाजन, नितीन बावीस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, प्रविण मांडोळे, बबन पाटील, महेश सोमवंशी तसेच फैजपुर पो.स्टे.चे सपोनि निलेश वाघ, रशिद तडवी, सचिन घुगे, अरुण नमायते अशांचे पथक तयार करण्यात आले होते.
दोन्ही पथक फैजपुरपासून रात्रदिवस करीत सलग २ दिवस सर्व सीसीटीव्ही फुटेज बघत बघत फैजपुर, वाघोदा, उटखेडा रोड रावेर, पाल, तेथून मध्यप्रदेश राज्यातील चिरीया, देवला, बिस्टान खरगोन, मेणगाव, कसरावत, सनावद, बडवाह, महू, प्रिथमपुर मार्गे इंदौरपर्यत पोहचून तिथे तळ मारून बसले होते. त्यावेळी पथकास माहिती मिळाली की, खरगोन जिल्ह्यातील सुभाटी गावा जवळील पोलीस चौकी खलटाका थाना बलकवाडा जिखरगोन मध्यप्रदेश येथे मिळून आला आहे. पथकाने ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.