ठाण्यातील ज्वेलर्स दुकानाच्या दरोडाप्रकरणी सुरतमधून आंतरराज्य टोळीला अटक

ठाणे वृत्तसंस्था :- नौपाडा परिसरातील वामन शकर मराठे ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. याच गुन्ह्यांत पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या सुरत मधून अटक केली असून ते सर्वजण आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत
ठाण्यात ज्वेलर्स दुकानात लूट करून गुजरात राज्यात लपून बसलेल्या आरोपींचा तांत्रिक अभ्यास आणि मोबाईलचे विश्लेषण करत पोलीस पथकाने आरोपी लिलाराम उर्फ लिलेश मालाराम मेषवाल (२९) चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती (३५) जैसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी (३२) दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया (२४) नागजीराम प्रतापजी मेघवाल (२९) यांना सुरत येथून अटक करून त्यांच्याकडील ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडेपाच किलो वजनी चांदीची नाणी, भांडी व दागिने, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल फोन व इतर वस्तू असा २९ लाख १५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, अटक सर्व आरोपीना ठाणे न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नौपाडा परिसरात वामन शंकर मराठे ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. १७ डिसेंबरला या दुकानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकोयंडा व शटर तोडून काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील २८ लाख ७७ हजार ४९० रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. दुसर दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदार व्यापाऱ्याने नौपाडा पोलिसांना ही माहिती सांगितली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, दिपक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, संदीप भोसले, पोलीस हवालदार दिपक गडगे, राजाराम पाटील, आशिष ठाकूर, दादासाहेब पाटील, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस नाईक रविंद्र हासे, सुमीत मधाळे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, योगेश शिरसागर, रोहन म्हात्रे, दत्तात्रय घोडके, मयुर शिरसाठ, चालक पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली.