शेतात हवेत केला गोळीबार, व्हिडीओ व्हायरल होताच बंदूकबाज एलसीबीच्या जाळ्यात
महा पोलीस न्यूज । ३० जुलै २०२४ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याला शेतात एक तरुण हवेत गोळीबार करीत असल्याचा व्हिडीओ मिळाला होता. वरिष्ठांना माहिती देत लागलीच पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हवेत फायरिंग करणाऱ्याला पोलिसांनी अडावद येथून ताब्यात घेतले तर त्याला गावठी कट्टा देणाऱ्याला भिवंडी परिसरातून पोलिसांनी उचलले. दोघांकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहेत. याबाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते. दि.२७ रोजी हवालदार हरिलाल पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून एक इसम हा हातात पिस्टल घेवून निर्जस्थळी गावठी कट्टयाने फायरींग करीत असतांनाचा व्हीडीओ व्हाट्सअँपवर प्राप्त झाला होतो. त्यांनी लागलीच याबाबत वरिष्ठांना कळवले.
गोळीबार करणाऱ्या तरुणाचा शोध घेणेकामी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथक तयार करुन रवाना केले होते. पथकाने माहिती काढत गोळीबार करणाऱ्या विशाल राजेंद्र ठाकुर, रा.इंदिरा नगर, अडावद याला ताब्यात घेतले. त्याने फायरींग उनपदेवकडे जाणाऱ्या शेतामध्ये केल्याची सांगीतले होते. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हा रोहन रविंद्र पाटील, रा.लोणी ता. चोपडा ह.मु.कोनगाव भिवडी जि.ठाणे याचे सोबत खरेदी केल्याची माहिती त्याने दिल्याने पथक लागलीच रवाना झाले.
दोन दिवस पथकाचा ठाणे मुक्काम
पथकाने दोन दिवस ठाणे परिसरात फिरून कोनगाव येथे जावून रोहन पाटील यास ताब्यात घेतले. विचारपुस केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गावठी कट्टा हा लोणी ता.चोपडा येथे लपवून ठेवला असल्याचे सांगीतले. त्यावरून पथक हे लोणी येथे पोहचले आणि त्यांनी गावठी कट्टा हस्तगत केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हरिलाल पाटील, विष्णु बिन्हाडे, हेमंत पाटील, प्रदिप सपकाळे, भारत पाटील, प्रदिप चवरे यांच्या पथकाने केली आहे.