चोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षापासून फरार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज | २७ फेब्रुवारी २०२४ | चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्या ३ वर्षापासून फरार असलेल्या संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धिरज अरुण कानडे वय-२६, रा.आडगाव, ता.एरंडोल असे आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पो.स्टे. गुरन २४४/२०२१ भादंवि कलम ३७९ मधील पाहिजे असलेला आरोपी नामे धिरज अरुण कानडे हा गेल्या तीन वर्षापासून फरार होता. संशयीत आकाशवाणी चौक जळगाव भागात येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना प्राप्त झाल्याने वर त्यांनी पथकाला रवाना केले होते. पथकाने शिताफीने पकडून त्यास नांव गाव विचारता त्याचे नांव धिरज अरुण कानडे वय-२६, रा.आडगाव, ता.एरंडोल असे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपुस करुन पुढील कायदेशीर कारवाई करीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाणे, पोकॉ.हेमंत पाटील यांच्या पथकाने केली आहे.