तलवार घेऊन दहशत माजवणे आले अंगाशी, एकाला अटक
महा पोलीस न्यूज | १३ जून २०२४ | जळगाव शहरात तांबापुरा भागात हातात तलवार घेऊन दहशत माजवणे एकाच्या अंगाशी आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून तलवार हस्तगत केली आहे. फैजल शेख कदीर, वय १८ वर्ष असे संशयीत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विरुध्द फैजल शेख कदीर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोस्टे गुरंन ३८३/२०२४ आर्म एक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, फैजल शेख कदीर, वय १८ वर्षे, रा.मास्टर कॉलनी, मेहरुण जळगाव हा जळगाव शहरातील खदान, तांबापुराजवळ हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवित आहे. माहिती मिळताच दुपारी १२.३० वाजता त्यास तांबापुरा येथील खदान जवळुन पथकाने ताब्यात घेतले होते. त्याचेकडुन एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
संपूर्ण कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, चंद्रकात पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर, अशांनी केली आहे.