थरारक : मध्यरात्री रस्ता ओलांडणाऱ्या डॉक्टरला भरधाव कारने उडवले
महा पोलीस न्यूज | ९ मे २०२४ | जळगाव शहरातील काव्यारत्नावली चौकाजवळ असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेस समोर रस्ता ओलांडणाऱ्या मुंबईच्या डॉक्टरला भरधाव कारने उडवल्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनचे डॉक्टर हर्षद भाऊराव लांडे वय – ४३ हे बुधवारी जळगावात एका बैठकीसाठी आले होते. नवीन बसस्थानकजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले होते. रात्री हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये थांबलेल्या डॉक्टर मित्राला भेटण्यासाठी ते आले होते. मित्राला भेटून बाहेर पडल्यावर ते पायी फिरण्यासाठी काव्य रत्नावली चौकाकडे जात होते.
रात्री १२ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना काव्य रत्नावली चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. धडकेत लांबवर फेकले गेल्याने डॉ.हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार इरफान मलिक करीत आहे.
मृत डॉ.हर्षद लांडे हे एक प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांचे भाऊ शत्रुघ्न माळी हे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय मृतदेह घेऊन रवाना झाले.
पहा संपूर्ण व्हिडिओ :