Crime

अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात, ५ दुचाकी हस्तगत, २ घरफोडी उघड

महा पोलीस न्यूज | २८ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरी वाढल्या असून त्या संदर्भात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्याने ५ दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहीती काढून चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४/२०१७ भा.दं.वि. कलम ३७९ मधील पाहीजे असलेला आरोपी सुरेश राजाराम बारेला वय-२५ रा. देवली-दुगानी ता.वरला जि.बडवाणी ह.मु. सुंदरगढी, ता.चोपडा हा चोपडा शहरात महात्मा गांधी कॉलेज रोडवर शांती वाईन शॉपजवळ आला असल्याची संधी साधत सापळा रचून त्यास जागीच पकडले. पथकाने चौकशी केली असता त्याच्या ताब्यात होन्डा कंपनीची युनिक्रॉन मो.सा. क्रं. MP.46.MT.3272 ही मिळून आली. दुचाकीतबाबत त्यास विचारपूस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्या मोटर सायकलबाबत माहीती घेतली असता मोटर सायकलचा रजि. क्रमांक MH.19.BR.7061 असा मिळून आला.

पथकाने पोलिसी खाक्या दाखवून त्यावरुन त्यास अधिक विचारपुस करता त्याने मोटरसायकल भोकणी ता.धरणगांव येथून चोरी केल्याचे सांगितले. चोरट्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने जळगांव शहरातून ३ मोटर सायकल, अमळनेर शहरातुन १ मो.सा. तसेच चोपडा शहरात व शिरपुर शहरात घरफोडी केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे आरोपी सुरेश बारेला याचेकडुन एकूण १ लाख ४८ हजर ३७० रुपयाचा मुद्देमाल त्यात ३ मोटर सायकल व घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरट्याने ५ दुचाकी काढून दिल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कमलाकर बागुल, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, अनिल देशमुख, संदिप साळवे, ईश्वर पाटील, चालक महेश सोमवंशी, लोकेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button